Monday, July 14, 2014

फुटबॉलचा कुंभमेळा

...आणि आपण सगळेच

 
लेखांक ११९
                 फुटबॉलचा
कुंभमेळा 

सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

                    ब्राझीलसहित दक्षिण अमेरिकेमध्ये फुटबॉलचा जागतिक कुंभमेळा चालू आहे. युरोपियन सार्वभौम कर्जसंकट युरोपियन संघांची विश्वचषकातील कामगिरी : स्पेन, इंग्लंड, इटली या संघांच्या फिफा विश्वचषकामधील कामगिरीमध्ये युरोपियन सार्वभौम कर्ज संकटाचे प्रतिबिंब उमटलेले दिसत आहे. (बेल्जियम आणि स्वित्झर्लंड व ऐतिहासिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या तटस्थ आहेत.)
     रोनाल्डोचा पोर्तुगाल अत्यंत वाईट पद्धतीने हरला. २०१० चा विश्वचषक विजेता स्पेन माजी विजेता वाटलाच नाही. यावेळी स्पेन पहिल्या फेरीतच गारद झाला. स्पेनची आणखी एक भन्नाट युरोपियन संघ हॉलंड म्हणजेच नेदरलँडसने कत्तल केली. इंग्लंडही स्पर्धेबाहेर पडले आहे. इटली कोस्टारिकाकडून हरल्यामुळे बाहेर पडला आहे. फ्रान्स अजून आव्हान टिकवून आहे परंतु यावेळचा फ्रान्सचा संघ नेहमीसारखा ताकदवान वाटत नाही. (प्लॅटिनी किंवा झिनेदीन झिदान असताना जेवढा ताकदवान होता तेवढा) फिफा विश्वचषक स्पर्धा आता कोपा अमेरिकांना स्पर्धा वाटत आहे, जी पूर्वी युरोपियन स्पर्धा वाटत असे.
      हे युरोपियन संघ बहुदा आजच्या युरोपसारखेच थकलेले आणि नियोजनाचा अभाव असलेले दिसत आहेत. खेळातील आणीबाणीच्या क्षणांना उदाहरणार्थ इटली किंवा स्पेन विश्वचषकामधून बाहेर पडत असल्याचे दिसत असताना त्यांच्या खेळामध्ये जोरदार प्रतिआक्रमणांची आग दिसत नव्हती. गोल करण्याची इच्छाशक्ती दिसत नव्हती. खरं म्हणजे थकल्याची जाणीव त्यांच्या हावभावांमधून दिसत हेाती. त्यांना काय करावं कळतच नाही असं वाटत होतं म्हणून वेळ पूर्ण करण्याचे कर्मकांड ते करत असल्यासारखं वाटत होतं.
      जर्मनी हा एकमेव युरोपियन देश सार्वभौम कर्ज संकटाला आरामात आणि आत्मविश्वासाने सामोरा जात आहे. तसाच विश्वचषकामध्येही आत्मविश्वास असणारा एकमेव युरोपियन संघ जर्मनीच वाटतोय. हॉलंडचा संघही उत्कृष्ट क्षमतेचा असला तरी बेभरवशाचा आहे. हा संघ कधी आळशी आणि निष्काळजी कामगिरी करेल हे सांगता येत नाही.
                जर्मन संघाचा खेळही जर्मन व्यक्तिमत्त्वासारखाच विचारी, अचूक आणि शिस्तबद्ध आहे. जर्मन व्यक्तिमत्त्व मला आवडते (हिटलर सोडून) परंतु जर्मन संघाचा फुटबॉलकडे बघण्याचाआधुनिकदृष्टिकोन मला आवडत नाही तो निरस वाटतो.
                वैयक्तिक मला ब्राझीलचा संघ आवडतो. त्यांचा फुटबॉल खेळउत्तर आधुनिक आहे उत्कंठावर्धक, आणि वेगवान, ब्राझीलचा फुटबॉल काव्यमय आहे. त्यांचा खेळ मला (इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील) भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाची आठवण करून देतो. ब्राझीलचे खेळाडू दिसताना निवांत आरामात दिसतात परंतु (किंवा म्हणूनच) त्यांचा खेळ मात्र अत्यंत स्फोटक आहे. अशक्य अशा प्रकारचे गोल करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. ती त्यांची क्षमता विरोधी संघांना धडकी भरवणारी आणि त्यातूनच चुका करायला लावणारी आहे. ही सर्व दक्षिण अमेरिकी फुटबॉलचीच वैशिष्ट्ये आहेत. आपण त्यांना लॅटिन दृष्टिकोन असंही म्हणू शकतो.


      युरोपियन फुटबॉल, शास्त्रीय संगीतासारखे असते. तर ब्राझील, उरुग्वे, कोस्टारिका कोलंबिया (आणि मला आठवतंय कोलंबियन ड्रग कार्टेल परंतु शकीरा आश्वस्त करून जाते) अर्जेंटिना (मेस्सीबरोबरच मला आठवतो अर्जेंटिनाचा लष्करी हुकूमशहा पेरॉन, ब्रॉडवे संगीत गायक त्याचंही नाव पेरॉन आणि मॅडोनाने इव्हा पेरॉनची भूमिका केलेला चित्रपट) आणि चिलीसुद्धा (दुर्दैवाने मला आठवतोय चिलीचा लष्करी हुकूमशहा जनरल पिनेशेट आणि साल्वादोर आलेंदेची हत्या) वाटतात उत्साही लॅटिन संगीतासारखे (जेनिफर लोपेज, शकिरा, रिकी मार्टिन आठवा....तुम्ही सर्व दक्षिण अमेरिकी हुकूमशहांना विसरून जाल)
                दुसऱ्या महायुद्धाने जगावरील युरोपचा प्रभाव संपत चालल्याची जाणीव करून दिली.
      सुवेझ कालवा पेचप्रसंगाने (१९५६) ब्रिटन व फ्रान्स आता जागतिक महासत्ता नसल्याचे सिद्ध झाले. हा विश्वचषक सार्वभौम कर्ज संकटासारखाच आकाराला येताना दिसतोय.
                माझं दु: एवढंच आहे की या चित्रामध्ये आजूबाजूला भारत कुठेही नाही. भारत त्या कुंभमेळ्याच्या कुठे आसपास सुद्धा पोचण्याच्या परिस्थितीत नाही. फुटबॉल हा खरा जागतिक खेळ आहे - कारण जगातले बहुतेक सर्व देश फुटबॉल खेळतात. प्रत्येक खंडातून फुटबॉलच्या निवडीच्या फेऱ्या खेळल्या जातात, त्यातून अंतिम फेरीसाठी ३२ देशांची निवड होते. वर्षांत एकदा वर्ल्ड कपचा कुंभमेळा भरतो. भारत १५४ क्रमांकावर आहे. फुटबॉलमध्ये आपण वर्ल्ड कप जिंकणं तर सोडाच, वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीला पात्र होणाऱ्या ३२ मध्येही नाही. आपण आशियात सुद्धा कुठे जिंकण्याच्या आसपास नाही. बहुदा,सार्कमध्ये आपण जिंकू! १२५ कोटींच्या देशाच्या व्यवस्थेतून सध्या तरी जागतिक दर्जाचा फुटबॉल खेळू शकणाऱ्या ११ जणांचा संघ साकार होऊ शकत नाही. कारण ज्या व्यवस्थेतून असे ११ जण आकाराला यावेत अशी सध्या तरी आपली परिस्थिती नाही, असे कुठे कानाकोपऱ्यात ११ जण असलेच तर त्यांच्या गुणवत्तेचा गळा घोटून, त्यांना सुमार दर्जाचे बनवून, नोकऱ्या शोधायच्या दारात भिकारी बनवून टाकणारी आजचीव्यवस्थाआहे. प्रत्येक व्यक्तीतली गुणवत्ता ओळखून, तिला बहरायला संधी देणारी सध्याची व्यवस्था नाही. सर्वांनाछापाचे गणपती बनवण्यासाठी एकाच साच्यात घातल्यामुळे शेवटी माणसाचं माकड बनवणारी ही व्यवस्था होऊन बसलीय. आपल्या समकालीन संस्कृतीमध्ये माणसाला घडवताना, माणसाचं मूल्यमापन करतानागुणवत्ता हा शेवटचाच काय, निकषच नाही. जर असलाच तरगुणवत्ता हा बोनस आहे, ‘गुणवत्ताखपवून घेतली जाईल, पण मुख्य निकष जातपात, पैसा, सत्ता, ओळखीपाळखी... हे आहेत. एकमेकांना कापून काढण्याची कुशलता घडवलेल्या समकालीन संस्कृतीतून जगज्जेते होणाऱ्या ११ खेळाडूंचा संघ कसा काय साकार होणार?
      तसे आपण हॉकीमध्ये जगज्जेते होतो - स्वातंत्र्यपूर्व काळात, ‘गोऱ्या साहेबाच्या मालकीमध्ये गपगुमान राहात होतो, तोवर जगज्जेते. स्वातंत्र्य, सार्वभौत्व मिळवल्यावर हॉकीमधलं आपलं कर्तृत्व काय, तर आधी सुवर्णपदक गमवायला सुरुवात झाली, मग ब्राँझवर समाधानी राहायला शिकलो आपण. मग ज्या देशांना पात्रता फेरी खेळता हॉकीचा वर्ल्ड कप किंवा ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळतो, त्यात आपण आहोत यात गौरव समजायला लागलो. मग पात्रता फेरी खेळावी लागण्याचीही वेळ आली आणि शेवटी ऑलिम्पिक्सच्या इतिहासातला सर्वांत उत्तम ऑलिम्पिक जेव्हा चीन आयोजित करत होता, २००८ मध्ये, तेंव्हा ऑलिम्पिकसाठी पात्र सुद्धा न ठरण्याचं कर्तृत्व करून दाखवलं आपण.
                टीमवर्कमध्ये कमी पडण्याची संस्कृती जोपासलीय आपण सध्या. एकमेकांनापास देताना, आपण एकटीम आहोत आणि जिंकणं हे आपलं सर्वांचं समान उद्दिष्ट आहे असंकिलर इंस्टिंक्ट नसतंच. याला कशाला पास देऊ, हा माझा जातवाला नाही. बरं म्हणून फार जातवाल्यांना एकमेकांबद्दल बंधुभाव असतो असंही नाही, दुसऱ्याचा द्वेष करायला एकत्र येण्याचं नाव म्हणजे जात! याला पास दिला अन् त्यानं गोल मारला, तर त्याला साल्याला क्रेडिट मिळेल - गोल नाही लागला तरी चालेल, पण त्याला पास देणार नाही. कसं मिळणार जगज्जेतेपद? उलट असलेलं जगज्जेतेपद जात जात, त्या खेळातली पात्रता सुद्धा गमावण्याचं कर्तृत्वच आकाराला येणार.
      पण खेळत तर राहायला पाहिजे, कारण त्यात पैसा, परदेशगमन वगैरे संधी आहेत! मग देशाच्या बोडख्यावर बसतं एक दिवस पळपुटं तत्त्वज्ञान :हारजीत महत्त्वाची नाही, सहभाग महत्त्वाचा आहे- खेळायला उतरायचं तर जिंकण्याच्या जिद्दीनंच खेळायचं असतं, मग नाही जिंकलो, तर खचून न जाता, सुधारणा करून, पुन्हा जिंकण्यासाठी सहभागी व्हायचं असतं. पण हे सांगणारीव्यवस्था सध्या तरी नाही. उलट हेकिल्करणारी व्यवस्था आहे.
      त्यामुळे टीमवर्कच्या खेळांत आपण मार खातो. थोडंफार बस्तान बसवून आहोत क्रिकेटमध्ये -क्रिकेट भारतात पॉप्युलर आहे, पण तो काही जागतिक खेळ नाही, खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळणारे देश -१० . वर्ल्डकरता आकडा भरावा म्हणून अफगाणिस्तान, कॅनडा वगैरे इकडून तिकडून गोळा करून आणावे लागातात, तर झिंबाब्वे, केनिया वगैरे एके वेळी बरे वाटणारे देश क्रिकेटपेक्षा देशांतर्गत टोळीयुद्धातला रक्तपात जास्त महत्त्वाचा समजतात. आपण क्रिकेटच्या गल्लीतले आलटून पालटून दादा असतो. त्यातही आता खेळ कमी आणि धंदा, बेटिंग, मॅच फिक्सिंग, राजकारण, हवाला, पार्ट्या, पोरी... असंच अंदाधुंदलीगआलं. आत्ताच्या पिढीमध्ये मात्र क्रिकेटपेक्षा फुटबॉलबद्दल आकर्षण वाढताना दिसतंय. आता ते वर्ल्ड कप पुरतं आहे की नंतरही टिकणारयातून भारतातलं फुटबॉल नीट संघटित होणार आणि मग त्यातून एक जागतिक दर्जाची टीम उभी राहणारहा प्रवास होतो की नाही, हे बघायचं.
      टॅलंट किल् करणाऱ्या व्यवस्थेशी झगडत झगडत कधी कधी एकेकटे चँपियन पुढे येतात. सरासरी एका पिढीतून - टेनिसमध्ये एक रामनाथ कृष्णन्, नंतर एक विजय अमृतराज... संपली यादी. बॅडमिंटनमध्ये एका पिढीला एक नंदू नाटेकर, नंतर एक प्रकाश पदुकोणे आणि शेवटी एक गोपीचंद. ‘नकोशीझालेली एक साईना नेहवाल मुलीच्या जन्माच्या वेदना आणि अडचणींवर मात करत भारताचा झेंडा फडकवत ठेवते. आईच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेुळे एक विश्वनाथन् आनंद बुद्धिबळातला जागतिक चँपियन होण्यापर्यंत पोचतो. अंजली भागवत आणि अभिनव बिंद्रालाशूटिंगमधलं जागतिक विजेतेपद मिळवताना खेळातल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आपल्याव्यवस्थेविरुद्धच जास्त लढावं लागलेलं असतं. मग काय, जिंकणारा समाज घडवणारी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था तयार होण्यासाठी आपल्या परीनं काम करत फुटबॉलचा कुंभमेळा एंजॉय करण्यात मी गढून जातो

4 comments:

  1. सर, You Tube वर Upload केलेलं बजेट वरच व्याख्यान अभ्यासपूर्ण आहे. TED ही वेबसाईट तुम्ही पाहिली आहे का ? नसल्यास जरूर पाहावी.'चाणक्य मंडल' अभ्यास महोत्सवाप्रमाणे TED event आयोजित करू शकेल.एखादी theme घेऊन आणि विविध क्षेत्रातील तज्ञ एकत्र करून.अजून आपल्याकडे TED ही कल्पना फारशी नाही. पण, ती अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी ही लिंक जरूर पहावी. http://www.ted.com/participate/organize-a-local-tedx-event . चाणक्य मंडल ने TED event आयोजित केला तर महाराष्ट्रातील तो पहिलाच वेगळ्या पद्धतीचा TED event असेल.

    ReplyDelete
  2. Sir I am follower of your lectures on YouTube and blogs. your swachi olakh has made paradigm shift in my life. I am thankful for your help

    ReplyDelete
  3. आपले अखंड मार्गदर्शन लाभो,
    जिवेत शरद् शतम।

    It's SMS dilse.

    ReplyDelete
  4. Perfect Nilesh... kharach khup masta idea ahe. Sir tumhi plzzzzzzzz yacha vichar kara

    ReplyDelete