... आणि
आपण सगळेच
लोकमान्य टिळकांनी मूळ ज्या हेतूंनी
गणेशोत्सव सुरू केला ते सामाजिक आणि राष्ट्रीय हेतू कधीच हरवलेत, हा
आपल्या सगळ्यांच्याच अस्वस्थतेचा विषय आहे (असायला हवा). बघता बघता सार्वजनिक
गणेशोत्सवाला वर्गणी - म्हणजे खंडणी, मांडवाखालीच
मटका आणि दारू पिऊन घातलेला धिंगाणा, हिडीस
नाच असं स्वरूप येऊन बसलं. गेली काही वर्षं त्या आगीत तेल ओतलंय तडक-भडक रोषणाई, डॉल्बी
(मेला बिचारा या आठवड्यातच!) संगीताच्या टॉवर्सनी... आणि पहिल्या धारेची हातभट्टी
ढोसून,
गर्दीत / गच्चीत उभ्या असलेल्या पोरीबाळींकडे बघत केलेल्या कंबरेखालच्या
हालचाली... यात कसला आलाय देव आणि धर्म. आता तर अनेक ठिकाणी गणेशोत्सव मंडळ म्हणजे
राजकीय बेस - जसा एक साखर कारखाना म्हणजे एक आमदार, तसं एक
गणपती मंडळ म्हणजे एक नगरसेवक (सध्याचा किंवा भावी!)
सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य, लोक-जागृतीचा हेतू हरवून
गेल्यासारखं गणेशोत्सवाचं चित्र आहे. या चित्रातही कल्पकता, सामाजिक
दृष्टी दाखवून लोकहिताचे अनेक उपक्रम राबवणारी गणपती मंडळं आहेत. पुण्याचा दगडूशेट
आणि खरंतर मुंबईचा लालबागचा राजा ही खरंतर अशी मंडळं आहेत. म्हणून ती लक्षावधी
भाविकांची श्रद्धास्थानं आहेत. तिथे आपली सेवा सादर करणं, हजारोंच्या
संख्येनं शिस्तबद्धपणे अथर्वशीर्ष-पठण करणं किंवा
किमान दर्शन तरी घेणं यात भाविकांना कर्तव्य केल्याचं समाधान लाभतं, गौरव
वाटतो,
जगण्याचं बळ मिळतं.
लेखांक ८२ |
सामान्य
नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य
राजा आणि रझा
(संपादकास अनावृत्त पत्र)
प्रिय संपादक,
साप्ताहिक कलमनामा,
विषय : लालबागचा राजा आणि रझा
अकादमी
‘लालबागचा राजा’च्या
काही कार्यकर्त्यांनी गणेश दर्शनाला आलेल्या भाविकांशीच उर्मटपणानं वर्तणूक केली, धक्काबुक्की
केली. त्यातून महिलाही सुटल्या नाहीत. महिलांशी असभ्य आणि उर्मट वर्तणुकीचे प्रकार
झाले. ते सोडवायला मध्ये पडलेल्या महिला पोलिसांनाही धक्काबुक्कीचे प्रकार झाले.
यावर तुम्ही फेसबुक’वर
प्रतिक्रिया व्यक्त केली की, ‘लालबागचा राजा आणि रझा अकादमीत
आता फरक काय उरला?’ तुमच्या
वाक्याच्या मागे प्रश्नचिन्हाचं व्याकरण असलं तरी प्रश्नाचं स्वरूप ‘र्हेटरिकल’ (प्रश्न
हे भाष्य आहे - प्रश्न नाही.) ‘लालबागचा राजा’पाशी
गणेशोत्सवात घडलेला प्रकार आणि ११ ऑगस्ट २०१२ ला
आझाद मैदानावर रझा अकादमीनं बोलावलेल्या सभेच्या वेळी घडलेली दंगल यामध्ये साम्य
आहे,
असं तुम्हाला म्हणायचं असावं, असं तुमच्या ‘कॉमेंट’वरून
ध्वनित होतं. तसंच गृहीत धरून तुमच्या कॉमेंटखालच्या प्रतिक्रिया होत्या. तुमची
मूळ प्रतिक्रिया आणि त्याखालच्या कॉमेंट्स्मधलं वीष वाचल्यावर मला वाटलं की या
वेळच्या माझ्या स्तंभात जरा काही म्हणावं. ते ‘संपादकांस
अनावृत्त पत्र’ या स्वरूपात. ‘अनावृत्त’ वगैरे
म्हटलं की आकर्षक वाटतं नं! शिवाय ते छापण्याएवढा तुमच्यातला संपादक दिलदार आणि कॉन्फिडन्ट आहे. म्हणून लालबागचा राजा, रझा
अकादमी... आणि आपण सगळेच!
त्या दरबारातही भाविकांशीच
कार्यकर्त्यांनी उर्मटपणे वागणं, महिलांशी असभ्य वर्तन आणि महिला
पोलिसांनाच धक्काबुक्की ही आपल्या सगळ्यांनाच अस्वस्थ करणारी, राग
आणणारी गोष्ट आहे, असायला हवी.
आपली सर्वांचीच अस्वस्थता याहूनही सखोल
आणि वेदनादायक आहे. ‘लालबागच्या राजा’च्या दरबारात
घडलं ते नवीन नाही, वेगळं नाही. बहुतेक सगळीकडे हे असंच चाललंय. साईबाबा, पंढरपूरचा
विठोबा, तुळजा भवानी... वगैरे वगैरे. गणेशोत्सवातले सुरक्षारक्षक, पुजारी, बडवे
मंडळी भाविकांनाच हिडीसफिडीस करत असतात. उर्मटपणानं वागत असतात.
पूजा सांगायला, तीर्थप्रसाद द्यायला, फुलं
वाहायला पैसे-दक्षिणा मागत भाविकांच्या मागे मंदीरभर फिरत
असतात. सगळं पावित्र्य, स्वच्छता, सात्विकता
हरवली आहे. ‘कर्मे इशु भजावा’ म्हणणारी
ज्ञानोबा माऊली, ‘ठायीच बैसोनि, करा
एकचित्त’ म्हणणारे तुकोबाराय, ‘कांदा, मुळा
आणि भाजी । अवघी विठाबाई माझी ।।’ म्हणणारे संत सावता माळी सगळ्या
सगळ्यांचा पराभव केलाय समकालीन संस्कृतीच्या पतनानं.
पराभव लोकमान्यांच्या मूळ
सामाजिक-राष्ट्रीय दृष्टीचाही केलाय. आपल्याकडे उदात्त दृष्टिकोन घेऊन सुरू
झालेल्या संस्था-चळवळी-उपक्रमांना पुन्हापुन्हा, इतक्या
लवकर गंज का चढतो, मूळ स्वरूप का हरवतं, अस्सलपणा
संपून फक्त अर्थशून्य कर्मकांड का उरतं, या
सर्व प्रश्नांशी आपल्याला सर्वांनाच संघर्ष करायला हवा. प्रचंड कष्ट करणार्या
त्यागी कर्तबगार पिढ्या निरपेक्ष भावनेनं एखादं भव्य काम उभं करतात. त्यामागचा
त्याग,
कष्ट, दृष्टी काहीच न समजलेल्या पुढच्या पिढ्यांना त्यांच्या
कामाची फळं मात्र भोगायला मिळतात. ते काम उभं करायला, माणसं
जोडायला काय कष्ट घ्यावे लागले हे माहीत नसल्यामुळे नव्या पिढ्यांना आयताच जो
समृद्ध वारसा मिळतो, त्यांना त्याचं मोल वाटत नाही. फक्त
माज मात्र चढतो. असं का होतं, असा प्रश्न पडून आपली सगळ्यांचीच
झोप उडायला हवी. ज्याला जिथे कुठे जरा कसला अधिकार मिळतो, त्याला
त्याचा माज येतो, तो उर्मटपणा करत सुटतो - ‘विद्या
विनयेन शोभते’ वगैरे सगळं भूतकाळातलं झालं अशी सर्वत्रच आपली समकालीन
संस्कृती होऊन बसलीय. तेंव्हा देवाचे पुजारी भाविकांशीच उर्मटपणा करतात. दुकानदार
गिर्हाईकांशी, डॉक्टर पेशंटशी, वकील त्याच्या
अशीलाशी आणि लोकप्रतिनिधी किंवा सरकारी
अधिकारी सर्वसामान्य जनतेशी (पत्रकार प्रेक्षक किंवा
वाचकांशी)... उर्मटपणा, उर्मटपणा, उर्मटपणाच.
आपण एक उर्मट समाज झालोत. माणसामाणसातलं नातं परस्पर विश्वास, प्रेम, मैत्री, जिव्हाळा
यावर आधारित असण्यापेक्षा जात, पैसा, सत्ता, ओळखीपाळखी
यावर आधारित आहे. त्याचे परिणाम आपण सगळेच भोगतो आहोत, सगळ्यांना
भोगायला लावतो आहोत.
एवढ्या सर्व अर्थांनी ‘लालबागच्या
राजा’समोर
घडलेला सांस्कृतिक गुन्हा, रझा अकादमीच्या ११ ऑगस्ट २०१२ च्या
आझाद मैदानावर घडलेल्या प्रकारापेक्षा, कदाचित गंभीर, अस्वस्थ
करणारा म्हणता
येईल.
पण मूळ ‘कॉमेंट’ आणि
त्याखाली फेसबुकवरच्या अत्यंत विषारी प्रतिक्रियांमध्ये
अशी निर्मितीक्षम अस्वस्थता मला तरी जाणवत नाही. लालबागच्या राजाचं रझा अकादमीशी
कोणत्या प्रकारचं साम्य आहे (काय फरक उरला, म्हणताना)
हे समजून घ्यायला मला आवडेल.
११ ऑगस्ट २०१२ ला
आझाद मैदानावर रझा अकादमीनं निषेध सभा योजली होती.
त्याचं लालबागच्या राजाशी काय साम्य आहे?
निषेध होता आसाममधल्या कोक्राझार
जिल्ह्यात बोडो-मुस्लिमांच्या दंगलीत झळ बसलेल्या बांगला देशी, बेकायदेशीर
घुसखोरांच्या बाजूनं. आणि म्यानमारमधल्या रोहिंगीया
(म्हणजे भारतीय सुद्धा नाही) मुस्लिमांवर तिथल्या बौद्धांनी केलेल्या हिंसाचाराबद्दल.
त्याचं लालबागच्या राजाशी काय साम्य आहे?
रझा अकादमीच्या सभेला येतानाच अनेक जण
लाठ्या-काठ्या, पेट्रोल... तयारीनिशी आले. त्यांनी नियोजनबद्ध हल्ला चढवला.
ओबी व्हॅन जाळल्या. त्या व्हॅनमधल्या पत्रकारांना सांगितलं, इथून
पळून जा, नाहीतर तुमचे मुडदे पडतील. पळून गेलेल्या पत्रकारांनी
आपल्याला वेळेत पळून जाण्याची संधी देणार्या दंगलखोरांचे रसभरीत आभार मानणारे लेख
लिहिले.
त्याचं लालबागच्या राजाशी काय साम्य आहे?
रझा अकादमी मेळाव्याच्या दंगलीत
पद्धतशीरपणे पोलिसांवरच अटॅक करण्यात आला.
४०-५० पोलिस गंभीररित्या जखमी झाले. एक जण पुढे मेलाच. वर्दीतल्या महिला पोलिसांच्या अब्रूवर योजनापूर्वक हात टाकण्यात आला. अजूनपर्यंत सार्वजनिकरित्या सांगितल्या गेलेल्यापेक्षाही गंभीर प्रकार घडले. किमान एक पोलिस तर मरण पावला.
४०-५० पोलिस गंभीररित्या जखमी झाले. एक जण पुढे मेलाच. वर्दीतल्या महिला पोलिसांच्या अब्रूवर योजनापूर्वक हात टाकण्यात आला. अजूनपर्यंत सार्वजनिकरित्या सांगितल्या गेलेल्यापेक्षाही गंभीर प्रकार घडले. किमान एक पोलिस तर मरण पावला.
याचं तुम्हाला लालबागच्या राजाशी साम्य
वाटतं का?
११ ऑगस्ट २०१२ ला
योजनाबद्धरित्या चेकाळलेल्या मुस्लिम गुंडांनी देशासाठी प्राण अर्पण केलेल्या ‘अमर
जवान ज्योती’ची उन्मत्तपणे नासधूस केली.
याचं तुम्हाला लालबागच्या राजाशी साम्य वाटत
असेल तर काहीतरी गंभीर गफलत आहे.
पुरोगामी आणि सेक्युलर म्हणवण्याच्या
नादात फक्त बहुसंख्यांकांनाच धरून धोपटण्यात, हिंदू
समाज, हिंदू
धर्म,
त्यांच्या श्रद्धांचा सतत अधिक्षेप करण्यात अनेक उथळ पुरोगाम्यांना आपलं
सेक्युलरत्व सिद्ध झाल्यासारखं वाटतं. बहुजन समाज, तळागाळातला
समाज असं उठताबसता म्हणणार्या ‘आरामखुर्चीतल्या पुरोगाम्यां’ना
समजत नाही की तो बहुजन, तळागाळातला समाजच ‘लालबागच्या
राजा’समोर
असतो,
विठोबाच्या वारीत असतो, वरकरणी विस्कळित वाटणार्या
कुंभमेळ्यात असतो. मांढरदेवीपासून शिर्डी-शेगाव सर्वत्र बहुजन समाजच असतो.
त्याच्या श्रद्धांची, धर्माची विवेकनिष्ठ चिकित्सा व्हायलाच हवी. पण तुम्ही एकदम
त्याला देशद्रोहाच्या पातळीला नेऊन ठेवायला लागले. रझा अकादमी प्रकार हा देशाच्या
राज्यघटनेलाच, सार्वभौमत्वाला दिलेलं खुल्लम्खुल्ला आव्हान आहे. लालबागचा
राजाचे कार्यकर्ते गैर वागले - त्यांच्यावर कारवाई व्हावीच, पण
त्यांची कृत्यं म्हणजे राज्यघटना किंवा सार्वभौमत्वाला
आव्हान नाही.
हा प्रश्न आपण ‘सेक्युलर’चा
अर्थ काय समजतो यापाशी येऊन भिडतो. बहुसंख्यांकांच्या डोळ्यातल्या कुसळाची तुलना
अल्पसंख्यांकांनी उभारलेल्या मुसळाशी होणार असेल तर ‘सेक्युलर’चा
अर्थ होतो बहुसंख्यांक विरोध. अल्प किंवा बहु
संख्यांक असा भेद न करता सर्वांना एका समान न्यायानं मोजणारा ‘सेक्युलर’वाद
न्याय्य ठरेल. पण खोटी खोटी समतुल्यता Parity प्रस्थापित
करायला ‘बहुसंख्यांक भुरटा आणि अल्पसंख्यांक अतिरेकी यांच्यात फरक काय
उरला’
असं म्हणणं अन्यायाचं आहे.
मला समजणारा भारतीय वारसा ‘सेक्युलर’ शब्दाहून
सखोल आहे. विवेकानंद-गांधीजी-विनोबा (आणि अशी दीर्घ अनादी, अनंत
मालिका) यांच्या कृपेनं मी केवळ सर्वधर्म‘सम’भावच
नव्हे,
तर सर्वधर्म‘मम’भाव मानतो. सर्व धर्मांचा समान
आदरही करतो आणि चिकित्साच करायची तर सर्व धर्मांची तितक्याच आदरपूर्वक चिकित्सा
करतो. यात मला भारताचं भव्यत्व दिसतं.
‘सत्य’ एक आहे, तिकडे
जाण्याचे रस्ते मात्र अनेक आहेत, ज्याला मनापासून जो रस्ता पटतो, भावतो, समजतो
त्या रस्त्यानं प्रामाणिकपणे वाटचाल करावी, दुसरा
रस्ता किंवा त्यावरचा पथिक, कुणाचाही
द्वेष, हिंसाचार
याची गरज नाही. ही सर्वसमावेशक ‘भव्य’ भारतीय
जीवनदृष्टी आहे. त्यात भारताचंच नाही तर मानवतेचं भलं सामावलेलं आहे.
लालबागचा राजा आणि रझा अकादमीच्या
निमित्तानं एवढं सगळं मनात आलं, म्हणावंसं वाटलं, एवढंच.
बाकी काही उणंदुणं वाटल्यास क्षमस्व.
लोभ आहेच, असावा
ही विनंती.
आपला
मित्र,
अविनाश
धर्माधिकारी
This comment has been removed by the author.
ReplyDeleteI salute you sir! But what to do with this hard nut bastard politicians, who for the sake of vote banks they play with lives of people.
ReplyDeleteJai Hind
salute to your article sir
ReplyDeleteइस्लाम्, christianity हे सम्प्रदाय् अधर्माधारीत् आहेत्. त्यामुळे त्याबद्दल् मला सम् किन्वा मम् भाव काहिच् वाटत् नाही. सत्याकडे जायचे नसते तर् ते जाणायच असते हिन्दूत्व हा एक् सम्प्रदाय् नाही तसेच् तो एक् धर्मही नाही. त्यामधे ब्राम्हणधर्म, क्षत्रियधर्म्, वैश्यधर्म्, सेवाधर्म् असे धर्म सामावलेले आहेत्.
ReplyDelete