Saturday, January 17, 2015

पीके ते पॅरिस : पेशावरमार्गे

पीके.
इतका इनोदी काल्पनिक (कल्पक), हास्यास्पद (हसवणारा), शिणुमा आहे रावकाय सांगू तुम्हाला!
काही संकुचितबुरसटलेल्या विचाराच्या व्यक्तींना उगीचंच वाटतं की त्यात हिंदू धर्माचादेवदेवतांचा अपमान आहेवगैरे...
फारच सिरियसली घेतात बुवा हे लोक सिनेमात्यांना समजतच नाही की सिनेमा हे चार घटका मनोरंजनाचं साधन आहेमंदिरात जाताना जोडे काढून ठेवतात तसं सिनेमाला जाताना डोकं बाजूला ठेवून जायचं असतंफार तर्कशुद्ध प्रश्न विचारायचे नसतात,सुसंगती अपेक्षित धरायची नसते.
आता हा पीके.
कोण पीकेकुठला पीकेकाय पीकेकुठून आला - कोणत्या तरी परग्रहावरूनकोणता परग्रह - असलं काहीतरी काय विचारता रावकशाला आला - पुन्हा तेचहिंदू लोक कसे चुकीचे आहेतहिंदू कुटुंबात कसे चुकीचे संस्कार  केले  जातातहिंदू साधू  कसे ढोंगीलुटारू असतातहे दाखवून धर्मसंस्थापना करण्यासाठी आलानाहीतरी तुमच्या भगवद्गीतेत म्हटलेलंच आहे ना, ‘यदा यदाही  धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम् ॥’ - धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते तेव्हा तेव्हा धर्माचं उत्थान घडवायलादुष्टांचा संहार करून साधू-सज्जनांचं रक्षण करायला मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो... म्हणून आला पीके.
तुमच्याच धर्मात कलियुगाची कल्पना मांडलीयकलियुग चालू आहे नाधर्माच्या नावाखाली ढोंगी साधू तुम्हाला लुटताय्त.उगीचंच गझनीच्या महम्मदाची आठवण करून देऊन खोटा इतिहास शिकवताय्तगझनीचा महम्मद खरा एक उदाररसिक,कर्तबगार साम्राज्यनिर्माता होता - हे कळण्यासाठी तुम्ही पंडित नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडियाची मूळ आवृत्ती वाचावला हवी.संकुचितबुरसटलेल्या विचारांची माणसं खोटं खोटंच सांगतात की गझनीच्या महम्मदानं 25 वर्षांत 17 स्वार्या केल्यापूर्वेला अयोध्येपासून दक्षिणेला सोरटी सोमनाथापर्यंत प्रचंड कत्तली केल्याप्रचंड सोनं-संपत्ती लुटून नेलीस्त्रियांना बाजारात दासी म्हणून विकलं - तो स्वतआपण मूर्तीपूजकांच्या मुंडक्यांची कशी रास रचली असं सांगतो - पण ते अतिरंजित आहेत्याच्याबरोबर संस्कृत पंडित अल् बेरुनी होतातो सांगतो की कोणतंही कारण  नसताना  निरपराध्यांची  कत्तल करून गझनीच्या महम्मदानं हिंदूंच्या मनात इस्लामबद्दल कायमचा तिरस्कार निर्माण करून ठेवलापण अल् बेरुनी विश्वासार्ह नाहीत्याचा दस्तावेज ग्राह्य मानता येणार नाहीत्याच्या एक हजार वर्षं नंतर झालेल्या थोर मार्क्सवादी इतिहासकार रोमिला थापर विश्वासार्ह आहेतत्यांनी अल् बेरुनीचे पुरावे-दाखले खोडून काढूनआपल्या ‘सोमनाथ’ या अभ्यासपूर्णनि:पक्षपाती ग्रंथात सिद्ध केलंय की सोमनाथाचं मंदीर उद्धस्त करणंसंपत्तीची लूटलक्षावधींची कत्तल... असं काही घडलं नसलं पाहिजेहे विसाव्या शतकातले बुरसटलेल्या विचारांचे काही मूठभर लोक जातीय तणाव निर्माण करूनस्वत:च्या सत्तेचीस्वार्थाची  पोळी भाजून घेण्यासाठी  याचा वापर करतात.रोमिला थापर यांनी सिद्ध करून दाखवलंय की भारतावर आक्रमण करणं कशी तत्कालीन आशियाई राजकारणातली गझनीच्या महम्मदाची अपरिहार्यता होतीती समजावून घेण्याऐवजी हे जातीयतावादी उगीचंच त्याच्यावर टीका करतातखरंतर गझनीचा महम्मद मागासलेल्या भारतीय संस्कृतीला जागं करून वैश्विकतेचं परिमाण देणारा ‘व्हिजनरी’ होतात्या नादात काही थोड्या लोकांचा नाश झाला तर त्याचं काय एवढंसर्व नवनिर्मिती विनाशातूनविनाशानंतरच होतेपण या मागासलेल्या विचारसरणीच्या लोकांना ‘डीकन्स्ट्रक्शन’ नावाची आधुनिक विचारप्रणाली माहीतच नसते ना!
हे सगळं पीके नंपीके मध्ये किती मार्मिकपणे दाखवलंयतो ढोंगी  तपस्वीजी कसा लोकांना भीती दाखवून ‘मंदीर निर्माणच्या नावाखाली लुटतोलोकांच्या श्रद्धांचा गैरफायदा घेतोहा ‘मंदीर निर्माणचा संदर्भ देऊन तर वर्तमानकालीन वास्तवावर काय अचूक बोट ठेवलंयभारतीय राज्यघटनेच्या चौकटीत हायकोर्टानं ‘मंदीर निर्माणाचा मुद्दा संवैधानिक दृष्ट्या ग्राह्य धरूनमंदीर निर्माणाच्या बाजूनं कौल दिलायआता मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहेपण चित्रपटाच्या कलात्मक गरजेसाठी तो मुद्दा महत्त्वाचा नाहीउच्च दर्जाच्या कला निर्मितीसाठी असे ‘आर्टिस्टिक कॉम्प्रमाईजेस्’ करायला परवानगी आहे!
आता तुम्ही म्हणालतो पीके नग्नच का येतो पृथ्वीवरपरग्रहावरची एवढी विकसित संस्कृतीतर त्यांना माहीत नाही का की पृथ्वीवरची माणसं - ‘आयटेम साँग’ आणि सनी लिओन सोडता सर्व जण कपडे घालतातअशी पाहणी करून मग ‘लँडिंग’ करत नाहीत काका परग्रहावरचा सगळा सरकारी कारभार सुद्धा पृथ्वीप्रमाणेच भोंगळ आहेशिवाय असं बिचार्या एकट्यानग्न पीके ला सोडूनत्यांचं यान निघून का जातंकेवढी अडचण झाली त्या बिचार्या पीके लाएक तर तो ‘रिमोट’ ठेवायला त्याला दुसरी जागा नाहीअडकवला गळ्यातआता इतकी सहज चोरी शक्य आहे म्हटल्यावर राजस्थानी चोएला मोह झाला नसता तरच नवल.पाकिस्तानात असं झालं नसतंपाकिस्तानात पीके चा रिमोट गळ्यात सुरक्षित राहिला असतातिथे कायदा-सुव्यवस्था-सलोख्याचा आदर्श आहेपण राजस्थानात चोरी होणारशेवटी तो ‘रिमोट’ म्हणजे हिमालयात शिवानं साक्षात्कार देऊन तपस्वीजीला दिलेलं ‘माणिक’ आहे - त्यावर ‘मंदीर निर्माणचा आदेश आहे - अशा ‘रिमोटला मागणी आहे तोवर ‘पुरवठाहोणारच कीअर्थशास्त्रातला हा अगदीच मूलभूत ‘मागणी-पुरवठ्याचा सिद्धांत आहे.
बरं त्या विकसित परग्रहावरच्या विवस्त्र पीके ला नुसते हातात हात घेतले की डायरेक्ट मेंदूतून संपूर्ण भाषा ग्रहण करता येते - तर हातात हात घ्यायला स्त्रीच का पाहिजेपुरुषाचा (उदासंजय दत्तचाहात हातात घेऊन भाषा शोषून घेता येणार नाही काभारीच प्रश्न विचारतात बुवा तुम्हीअहो तो पीके ‘गे’ नाहीत्याला भाषा शिकायला स्त्रीचाच हात हातात घ्यावा लागतोआधीच तो संजय दत्त तुरुंगात बसून बसूनपुन्हा ‘फर्लो’ मागून दमलायत्याला कुठे पीके च्या हातात हात घालायला सांगताय.
शिवाय तुम्हाला हिन्दी चित्रपटांचा एक ‘फंडा’ समजलेला नाहीहिन्दी चित्रपट म्हणजे - काही चांगले अपवाद सोडता - "Movies made by mentally retarded people, for mentally retarded people of mentally retarded people' (अब्राहम लिंकन झिंदाबाद).पीके नं तर आणखी प्रगती साधलीयपीके ‘मेंटल रिटार्डेशनपाशी न थांबता ‘मेंटल परव्हर्शन’ - मंदबुद्धीकडून विकृत बुद्धीकडे -जातोम्हणजे बुद्धीचा विकास झाला ना!
बरंपीके चा रिमोट चोरीला जातोत्याला कळतं की यांचे वेगवेगळे भगवान आहेतते तुमच्या मागण्या पूर्ण करतातअडचणी सोडवतातम्हणून पीके त्या त्या भगवंताची फी भरून ‘माझा रिमोट सापडवून दे’ म्हणून मागणी नोंदवतोथोड्या काळात कोणीच आपली मागणी पूर्ण केली नाही आणि घेतलेले पैसे पण परत केले नाहीत म्हणून तो मंदिराच्या परिसरात देवांची चित्रं आणून चिकटवतो, ‘लापता भगवान’ म्हणून -
तिथे सगळे गणपतीशिवलक्ष्मी कसे काय?
पीके नं मुस्लिमख्रिश्चन इ... देवांकडे मागणी नोंदवली नाही का?
लापता’ फक्त हिंदू देवदेवता?
असं काय  करता?  सर्व देव एकच नाहीत काहे तुमचं हिंदू तत्त्व ना? ‘एकं सद् विप्राबहुधा वदन्ति’ म्हणूनम्हणजेच हिंदू देवदेवता दाखवल्या की सगळे देव आलेच कीसगळे देव एकच आहेततो काही हिंदू देव वेगळामुस्लिमख्रिश्चन देव वेगळा नाहीतुमच्याच मनात हा संकुचितपणा दिसतोय.
शिवाय मुस्लिम देव आणि प्रेषिताचं चित्रं काढायचं नसतंइस्लामला ते मंजूर नाहीअसं चित्र काढलं तर काय घडतं पाहिलंत ना तुम्ही पॅरिसमध्ये नुकतंचमग कशाला आपण हिंसाचाराला प्रवृत्त करणारं वागायचंभारत देश सर्व धर्मांचा आदर करणारा देश आहे.
ओकेपण मग ख्रिश्चन देव तरी चिकटवायचा ‘लापता भगवानच्या यादीतक्रॉसमदर मेरीमॅडोना अँड द चाईल्ड किंवासिस्टिन चॅपेलच्या छतावरचा तो दाढीवाला बाबाचालतो ख्रिश्चनांनाशिवाय चित्रंकार्टूनचित्रपट (दा विंची कोडकाढला म्हणून ख्रिश्चन लोक लगेच दंगलीकत्तलीहातपायतोडरक्तपात वगैरे करत नाहीतलावायचं की चित्र ‘लापता भगवानम्हणून!
त्यानं ‘सेक्युलरवादाला बाधा पोचते.
विसरा तुमचा तो जुना पुराणाप्राचीन भारततो वैभवसंपन्न होताते सुवर्णयुग होतंहेही तुमच्याच डोक्यातलं प्रतिगामी खूळ आहे.
आधुनिक भारत सेक्युलर आहेइथे अल्पसंख्यांकांच्या हक्काचं रक्षण केलं जातं.
पण बहुसंख्यांकांच्या - म्हणजे हिंदूंच्या भावनांचं कायहिंदू धर्माचा आदर करण्याचं काय?
पुन्हा तुमचे तेच जातीयप्रतिगामीबुरसटलेले प्रश्साध्या व्याख्या समजलेल्या नाहीत तुम्हालाएक तर मुळात हिंदू धर्मात दोष - जातीव्यवस्थाहुंडा वगैरे - आहेतचमग ते दाखवले तर बिघडतं कुठेहिंदू धर्मात दोष आहेत असं नव्हेहिंदू धर्मच दोष आहे असं ठामपणे दाखवणं म्हणजे सेक्युलरवाद.
पुढे कॉलेजात परीक्षेला जाताना त्यांच्या अंधश्रद्धा दाखवायला पीके एक दगड उचलून झाडाला कुंकू किंवा शेंदूर लावून ठेवतो -म्हणजे पुन्हा हिंदूच देव - हेही साहजिक नाही काज्या देशात हिंदू सुमारे 85% आहेत - तिथे एकूण टिंगलटवाळीचा सुद्धा 85%वाटा हिंदूंचा असणं अगदी साहजिकच आहेम्हणून पीके म्हणतो ‘जो डरता है वो मंदिर जाता है’ - मस्जिद किंवा गिरिजाघर जाता हैनाही म्हटला. ‘ॐ जय जगदीश हरे’ कसं बेसूर म्हणतात ते दाखवलंय.
राहून राहून प्रश्न पडतो की मुळात पृथ्वीवर येताना पीके नग्न कात्या अर्थी त्याचा परग्रह कॅलिफोर्नियातल्या ‘सान फर्नांडो व्हॅली - (अमेरिकेच्या पोर्न इंडस्ट्रीचं केंद्रअसावापण चित्रपटात पीके नं कमालीच्या बुद्धीवादी तर्हेनं समजावून सांगितलंय!पक्ष्याकडे बोट दाखवून तो ‘जग्गीला समजावून सांगतोतो पाहा कसा नैसर्गिक अवस्थेत आहे - त्याला वाईट समजतो का आपण!काय सॉलिड बुद्धिमत्ता आहेपरग्रहावर पीके चा आयक्यू मायनस् 140 असला पाहिजे!
आत्तापर्यंतचा हा तुमचा सगळा भांडकुदळ वितंडवाद ऐकून ऐकून एक गोष्ट तर स्पष्टच दिसतेयकीया चित्रपटाचं खरं मोठेपण तुम्हाला समजलेलंच नाही.
सर्वसाधारणपणे चांगली कलाकृती समस्या मांडतेउत्तरं सांगत नाहीउत्तरांचा शोध-समाधान ही जबाबदारी त्या कलाकृतीचा आस्वाद घेणार्या रसिकाची असतेरसिकाला समस्येचं आत्मभान देणं एवढीच कलाकृतीची जबाबदारीविजय तेंडुलकरांसारखे सार्वकालिक श्रेष्ठ साहित्यिक तर स्पष्टच सांगतात की उत्तरं मांडणं हे कलाकाराचंकलाकृतीचं काम नाही.
पण पीके ते सुद्धा करतो.
पीके उत्तर मांडतो.
हिंदू कुटुंबत्यात मुलींवर झालेले चुकीचेबुरसटलेले द्वेषजातीयताधर्मांधता शिकवणारे संस्कार या सर्वांतून मुक्त होण्याचा उपाय काय?
पाकिस्तानसरफराज.
तुमच्या संकुचित मनाला लगेच आठवलंय की इंटरनेटवरचे भारताचे पत्ते जसे ‘डॉट इन्’ असतात तसे पाकिस्तानातले पत्ते ‘डॉट पीके’ असतात!
तुमच्या या जातीय स्मरणशक्तीचा निषेध केला पाहिजे.
जातीयच नाही तर धर्मांध सुद्धा.
पाकिस्तान केवळ मुस्लिम देश म्हणून तुम्ही त्याचा द्वेष करतापाकिस्तानच्या लक्षावधी मदरशांमधून भारत - हिंदू द्वेषाची शिकवण दिली जाते असा अपप्रचार करतापाकिस्तान म्हणजे अजमल कसाबझाकी-उर्-रहमान लाखवीहाफीज सईदमौलवी अझर मसूदलष्कर--तैयबाजमियत-उद्-दावाISIप्रॉक्सी वॉर... असा सगळा खोटा प्रचार करतापाकिस्तान म्हणजे ‘फेल्ड स्टेट’ - चोरीच्या मार्गानं अण्वस्त्रधारी देशती अण्वस्त्रं भारतावर टाकू असं गेल्या 10 वर्षांत तीनदा म्हटलेला देश.
किती द्वेषपूर्णधर्मांध आहात तुम्ही!
खरा पाकिस्तान किती चांगला देश आहे - शिवाय भारतीय - हिंदू मुलीच आपण होऊन पाकिस्तानी मुस्लिम मुलांच्या प्रेमात पडतातबाकी सगळा खोटाच प्रचार आहेबघा नासरफराज जग्गीशी चर्चमध्ये लग्न करायला तयार आहे - यातली मानवी एकात्मता समजत नाही का तुम्हालातर जग्गी गैरसमजामुळे सरफराज येण्यापूर्वीच चर्चमधून निघून जाते.
नंतर भारतीय चॅनेलवर ‘रिअॅलिटी शोमधून विदेशातल्या पाकिस्तानी दूतावासात नुसता फोन जातोत्यावर स्त्रीचा आवाज ऐकल्या क्षणी पाकिस्तानी दूतावासातली महिला किती आनंदित होतेलगेच ओळखतेआप जग्गी होभोवतीच्या सर्वांना आनंदानं सांगतेसुनो सुनोजग्गी का फोन आयाजग्गी का फोन आयाआता लाहोरला परतलेला सरफराज रोज 9 वाजता दूतासावात फोन करत असतो - कीमेरे लिए किसी लडकी का फोन आया थालगेच दूतावासातून जग्गीला सरफराजचा लाहोर नंबर जोडून दिला जातोकिती कार्यक्षमतुम्ही  खोटा  प्रचार  करता की पाकिस्तान भारताच्या काबूलमधल्या दूतावासावर हक्कानी नेटवर्कच्या द्वारा  दहशतवादी  हल्ला  घडवून  आणतोतुमचा द्वेषमूलक धर्मांध प्रचार आहे की पाकिस्तानी तालिबान पेशावरच्या शाळेवर हल्ला करून 200 पेक्षा जास्त मुलांची कत्तल करतोखरा पाकिस्तान पाहा किती प्रेमळ आहे!
भारतीय - विशेषतहिंदू स्त्रीच्या मुक्तीचा मार्ग?
पाकिस्तानी पती.
नाहीतरी 1947 नंतर पाकिस्तानातले हिंदू संपवून झालेहिंदू मुलींना  पळवून  नेऊनबलात्कार करूनसक्तीनं धर्मांतर करून त्यांचे मुसलमान मुलांशी निकाह लावून झालेतो पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहेकारण जगात कुठेही अन्य सर्वांना मानवाधिकार आहेतपण हिंदूंना मानवाधिकार नाहीतहिंदूंची बाजू घेणं म्हणजे जातीयतावादमग शेवटी पाकिस्तानातल्या हिंदू मुली संपल्याआता त्यांनी बघावं कुठेआहे ना आपला उदार भारतत्यातली जग्गी.
आपले साधूपुरुष सगळे कसे ढोंगी आहेतआजपर्यंत आपण जोपासलेली सगळी मूल्यं कशी चुकीची आहेत हे समजलेला जग्गीचा पिताआता तिचा सरफराजशी संबंध स्वीकारल्यावर कसा खूश होऊन पूर्वीप्रमाणेतिलाI am proud of youम्हणततोंडात बोटं घालून शिट्ट्या वाजवतो.
भारत-पाक संबंध सुरळीत करण्याचं कित्ती व्यावहारिक सोल्यूशन मांडलंय पीके नं!
शिवाय आता आपला दाऊद पाकिस्तानात आहेतरी बॉलिवुडशी त्याचे सांस्कृतिकआर्थिक संबंध आहेत.
मुघलांच्या जनानखान्यात आपल्या मुली वाढवण्याची आपली उदारसर्वसमावेशक इतिहास-परंपरा आहेच.

1 comment:

  1. bapre.. apratim lekh.. hinduna manawadhikar nahit... hech khara :(

    ReplyDelete