...आणि आपण सगळेच
लेखांक १२६ |
‘इस्लामिक दहशतवादा’चा धोका
सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य
सुरक्षा व्यवस्थेला असलेल्या सर्वांत मोठ्या, गंभीर
आणि घडू पाहणाऱ्या धोक्याला 'clear & present danger' म्हटलं जातं. इस्लामिक दहशतवाद हे
पुणे,
मुंबई, महाराष्ट्रासहित भारत आणि जगासाठी
'clear & present danger' आहे. ISIS (Islamic State of Iraq &
Syria/Shama : तुर्की-सिरिया
प्रदेशाला नाव ‘शाम’ हे आहे) - काही वेळा या
संघटनेचा उल्लेख ISIL होतो (Islamic
State of Iraq & Levant - ‘लेव्हॉ’ हे सिरिया-लेबनान
प्रदेशाचं बायबल कालीन नाव आहे)... तर अत्यंत
भयानक
हिंसक, क्रूर आणि धर्मांध ISIS ही ती
संघटना,
हा त्या इस्लामिक दहशतवादाचा सध्याचा
सर्वांत
आक्रमक आविष्कार आहे.
आता वर्षअखेरीला अमेरिका अफगाणिस्तानातून
माघारी
जाणार, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष हमीद
करझाईंचे दोन कालावधी पूर्ण होताय्त, म्हणून
अफगाणिस्तानात विवादास्पद राष्ट्राध्यक्ष निवडणूक
होते
आहे. अफगाणिस्तानची परिस्थिती समजणाऱ्या
कोणाच्याही लक्षात येईल की तालिबान अमेरिका
माघारी
जाण्याच्या मुहूर्ताची वाट पाहात दबा धरून
बसलेलं
असणार.
त्या तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा
असल्याचं आता सप्रमाण सिद्ध झालंय. पाकिस्तानचं
सर्व
अंतर्गत-लष्करी-परराष्ट्र धोरण भारताला
शत्रूस्थानी ठेवतं. म्हणून चीनशी सार्वकालिक मैत्री
आणि भारताविरोधात लढताना ‘स्ट्रॅटेजिक डेप्थ’हवी म्हणून अफगाणिस्तानमध्ये भारताला प्रतिकूल राजवट
- म्हणजे लोकशाही नाही, तालिबानची राजवट
हवी.
त्या तालिबानचं अल् कायदा आणि त्याचा
बिन लादेननंतरचा प्रमुख अयमान-अल्-जवाहिरी
यांना
संरक्षण आहे. जवाहिरी तर पाकिस्तानात क्वेट्टा, पेशावर आणि वजिरीस्तान भागात असू शकतो. या
आठवड्यात जवाहिरीनं भारतात अल् कायदाच्या
शाखा
सुरू झाल्याचं जाहीर केलं आणि भारतीय
मुस्लिमांना ‘जिहाद’साठी आवाहन केलं.
खरं म्हणजे यात नवीन काही नाही. अल्
कायदाची
स्थापना करताना १९९६ मध्येच बिन
लादेननं
जाहीर केलं होतं की अमेरिका शत्रू क्र. १ आहे आणि त्यापाठोपाठ भारत शत्रू क्र. २. जवाहिरीनं त्या घोषणेची उजळणी केली असं म्हणता
येईल.
काही जणांनी जवाहिरीच्या घोषणेचा अर्थ
केला
- लक्ष वेधून घेण्यासाठीची सनसनाटी चाल. त्यांच्या मते बिन लादेननंतर अल् कायदाचे आर्थिक
आधार आणि इस्लामिक जगतातला प्रभाव, दोन्ही
घटत चालले आहेत. विशेषत: सिरिया, इराकमध्ये
ISIS नं जी तुफानी चाल करून ‘खिलाफत’ स्थापन केल्याची घोषणा केली, त्यामुळे अल् कायदा फिकी
पडत चालली आहे. अल् कायदा आणि ISIS चं
‘खिलाफत’ स्थापन करून जागतिक इस्लाम एका
छताखाली
आणण्याचं, जगावर इस्लामचं राज्य
स्थापन
करण्याचं उद्दिष्ट एकसमान आहे.
भारतीय मुस्लिमांना जिहादचं आवाहन
करणारी
जवाहिरीची घोषणा नुसती ‘अॅकॅडेमिक’किंवा एक लक्षवेधी चाल समजणं भारतासाठी
(नेहमीप्रमाणे) बेसावध आणि आत्मघातकीपणाचं
ठरेल.
अल् कायदाला सहानुभूत घटक आत्ता सुद्धा
भारतात
आहेत. त्या घटकांनी स्वत:ला ‘इंडियन
मुजाहिदीन’ असं नाव घेतलंय. पुण्यातल्या ‘जर्मन
बेकरी’पासून बुद्धगयेतल्या बॉम्बस्फोटांपर्यंत ‘इंडियन
मुजाहिदीन’चा हात सिद्ध झालाय. यासीन भटकळ तर तुरुंगात आहे, पण चालू आठवड्यात ‘इंडियन
मुजाहिदीन’च्या मूळ संस्थापकांपैकी एक – एजाज
शेख,
पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यानंही
भारतीय
मुस्लिमांना जिहादचं आवाहन केलं होतं.
प्रश्न नुसत्या आवाहनाचा नाहीये. अल् कायदा
आणि तालिबानच काय, पार तिकडे इराकमध्ये
ISIS कडून लढण्यात ४ भारतीय – महाराष्ट्रातले
तरुण
सामील असल्याचं दिसून आलं. त्यातला एक
तिथे
मारला गेला. दुसऱ्यानं भारतीय मुस्लिमांना
जिहाद
करण्याचं आवाहन केलं. ISIS मध्ये सामील व्हायला निघालेली आणखी ४ मुलं पोलिसांनी पकडली. आत्ता सुद्धा भारतात - महाराष्ट्रात ISIS चे तळ असल्याच्या वार्ता आहेत.
तर तिकडे इराकमध्ये इस्लामिक शक्तींना
सावरायला, संघटित होऊन बळ वाढवायला वेळ
आणि संधी मिळाली असं दिसतंय. इराकमधल्या
अल् कायदाचा प्रमुख होता अल् झरकावी. तो
अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेला. पण २००३ मधल्या अमेरिकेच्या, आता एव्हाना सर्वस्वी असमर्थनीय म्हणून सिद्ध झालेल्या 'shock & awe' आक्रमणानं नव्या अतिरेकी शक्तींसाठी सुपीक
पृष्ठभूमी तयार केली. त्यावर अचानक अज्ञातातून
आल्यासारखा उगवून आला ‘अल् बगदादी’हा तसा मूळ इराकी उद्योजक. पण अमेरिकेच्या
इराक
आक्रमणानंतर त्यानं आपली आर्थिक
शक्ती
इराक मधल्या सुन्नी शक्ती संघटित करण्यामागे
लावली.
२००३ नंतर अमेरिकेच्या मार्गदर्शनाखाली
इराकसाठी लोकशाही राज्यघटना तयार करण्यात
आली.
ती राज्यघटना, त्यानंतरची निवडणूक - या प्रक्रियेशी इराकमधल्या शिया अरबांनी सहकार्य
केलं,
सुन्नी अरबांनी मुख्यत: बहिष्कार टाकला. इराकमधलं सरकार आणि पंतप्रधान मलिकी
शियापंथीय होते. शेजारचा, पश्चिमेकडचा सिरिया
- अध्यक्ष बशर असद - आणि पूर्वेकडचा इराण
शियापंथीयच. शियापंथीय इराण आपला अणुबॉम्ब
तयार
करत आपला प्रभाव भूध्य समुद्रापर्यंत
पोचवण्यात मग्न. म्हणून त्या इराणविरुद्ध निर्बंध
- आणि स्वत:च्या लोकांविरुद्ध – रासायनिक
अस्त्रं
वापरणाऱ्या सिरियाच्या असदविरुद्ध UN,
अमेरिका, NATO कारवाई करेल, अशा शक्यता
असताना,
त्या मावळताना, अचानक अज्ञातातून
आल्यासारखा वाटावा तसा ISIS चा उठाव
झाला.
ही जबरदस्त अशी सुन्नी प्रतिक्रिया होती. सिरियाच्या आणि इराकच्या उत्तरेकडचा भाग
जिंकून
घेत ISIS
नं ‘इस्लामिक स्टेट’ची स्थापना
केली.
अल् बगदादीच्या नावाची घोषणा ‘खलिफा’ म्हणून झाली. ISIS च्या अत्याचार, कत्तली, बलात्काराच्या कहाण्या भयानक अमानुष आहेत. त्याचे सर्वांत भीषण बळी ठरलेत, इराकच्या उत्तर
भागातले
‘येझिदी’ नावाचे अल्पसंख्यांक. त्यांना
‘इस्लामचा स्वीकार करा किंवा मरा’ असा पर्याय
देण्यात
आला. पुरुषांच्या कत्तली करण्यात आल्या, स्त्रियांवर बलात्कार करून त्यांना ‘सेक्स् स्लेव्ह’म्हणून डांबून ठेवण्यात आलं. ISIS च्या तावडीत
भारतीय
कामगार आणि नर्सेस् सापडल्या होत्या. भारतीय नर्सेस्ना सुखरूप सोडवून सन्मानानं परत
आणता
आलं हा भारताच्या ‘डिप्लोसी’चा विजयच
म्हणावा
लोगल. पण भविष्यकाळातल्या धोक्याच्या
तुलनेत,
हा अगदी छोटा
विजय
ठरतो.
नायजेरियातली अतिरेकी
इस्लामिक संघटना आहे
‘बोको हराम’. आता ही
बोको
हराम आणि ISIS, मुख्यत: मादक द्रव्यांच्या
व्यापारातून भारतात हातपाय
पसरत
असल्याच्या वार्ता
आहेत.
त्यांना ‘दाऊद’च्या नेटवर्कच्या मागून
पाकिस्तान-ISI आणि
पाकी
सैन्याचं सहकार्य, मार्गदर्शन आहे.
अतिरेकी इस्लामिक शक्तींची एक पक्की श्रद्धा
आहे की इस्लामी कालगणनेचं १५ वं शतक इस्लाम
च्या
जागतिक विजयाचं असणार आहे. आणि त्या
विजयाची
निर्णायक लढाई ‘गझवा-ए-हिंद’- अफगाणिस्तानपासून गंगेच्या खोऱ्यापर्यंत लढली
जाणार
आहे. ISIS, खिलाफत ही त्याची सुरुवात
आहे.
सुदैवानं भारतीय उलेांच्या संघटनेच्या
पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलंय की भारतीय मुस्लिमांनी अशा अतिरेकी आवाहनांना बळी न पडता, भारतावर निष्ठा ठेवूनच आचरण करावं. इस्लामचे
एक जागतिक अधिकारी समजले जाणारे, ‘देवबंद’स्कूलचे मौलाना वहिदुद्दिन खान यांनी - ‘दारुल
इस्लाम’विरुद्ध ‘दारुल हरब’ - अशा कोणत्याही
हिंसक
संघर्षात न पडता भारत ‘दारुल अमन’ (शांततेचा, भाईचाऱ्याचा प्रदेश) व्हावा – अशी
संकल्पना मांडलीय, भारतीय मुस्लिमांना तसं
आवाहन
केलंय.
इस्लामिक दहशतवादाच्या 'clear & present danger' चं उत्तर यात आहे.
गेल्या काही महीन्यातील इस्लाम दहशतवादी संघटनांच्या एकुण वाटचालीवरुन असे दिसुन येते की, या संघटना कुठल्या नं कुठल्या कारणावरुन जगातील सर्व प्रमुख देशांना महा़ुद्धाकडे ढकलत आहेत.
ReplyDelete